ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे पीठाधीश्वर अनंत विभुषीत श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज ( पंचायती आखाडा श्री निरंजनी ) यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून बी. ए ( इतिहास ) ची पदवी प्रदान करण्यात आली.
शिक्षणसंदर्भातील जन जागृती केल्याबद्दल त्यांना Excellence In Performance – 2021 ( उत्कृष्ट कार्य – २०२१ ) पुरस्कार वितरित करण्यात आला. कुलगुरू डॉ. ई. वायुनदंन( य. च.।म. मु. विद्यापीठ ), मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, म. वि. प्र संचालक सचिन पिंगळे, डाॅ. प्रकाश देशमुख ( य. च. म. मु. विद्यापीठ) प्राचार्य श्री. शिंदे, श्री गोसावी यांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी सिध्देश्वरानंद सरस्वती महाराज व सुदर्शनानंद सरस्वती महाराज यांना ही बी. ए ( इतिहास ) ची पदवी प्रदान करण्यात आली. श्रीनाथानंद सरस्वती महाराज, रविंद्र महाराज नन्नावरे, जिभाऊ खैर, संजय कोटेचा, प्रा. माधव खालकर आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.