एकट्या इगतपुरी शहरात सापडले तब्बल “एवढे” कोरोना बाधित ; तालुक्यात सुद्धा रुग्णसंख्येत झाली भक्कम वाढ

इगतपुरीनामा न्यूज, दि. २
इगतपुरी, घोटी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. आज शुक्रवारी एकाच दिवसात संपूर्ण तालुक्यात 55 कोरोनाबाधित आढळून आले. यापैकी एकट्या इगतपुरी शहरातच 39 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. ह्यातच अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर वाढणाऱ्या कोरोनाचा उद्रेक थोपवण्याचे मोठे आव्हान आहे. कोरोना तपासण्या वाढवल्या तर एकाच दिवशी शेकडो कोरोना बाधित रुग्णांचा भयानक आकडा समोर येण्याची शक्यता आहे. आज अखेर पर्यंत 371 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील प्रमुख गावांसह विविध भागांत कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. घोटी शहरात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 3 दिवसीय जनता कर्फ्यु आजपासून सुरू आहे. ह्या कर्फ्युला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आज एकाच दिवशी फक्त इगतपुरी शहरात 39 कोरोना बाधित आढळले आहेत. इगतपुरी शहरात नियमांची पायमल्ली होत असल्याच्या वाढत्या तक्रारी असल्याने येथेही प्रशासनाने कडक धोरण आखण्याची मागणी होते आहे. इगतपुरी, घोटी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात वाढलेल्या संख्येमुळे प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.

बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी उपयुक्त

कोरोना उद्रेकाचा सध्याचा हा काळ अत्यंत कसोटीचा काळ आहे. गेल्यावर्षी पेक्षा ह्यावेळी कोरोना संक्रमण अतिशय वेगाने होते आहे. बर्फानी आरोग्य प्लस ह्या आयुर्वेदिक औषधीमुळे मागील वर्षी मला चांगला फायदा झाला. कोरोनाची बाधा माझ्यापर्यंत आणि माझ्या लाडक्या परिवारापर्यंत येऊ नये म्हणून आमचा परिवार बर्फानी आरोग्य प्लसचे नियमित सेवन करतो. ह्या औषधीचा उपयोग बाधा होऊ नये म्हणून आणि बाधा झाली तर बचावासाठी झाल्याचे अनेक अनुभव आहेत. जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7057235819 ह्या क्रमांकावर संपर्क साधून औषधी उपलब्ध होईल.
– कैलास कडू, माजी सरपंच शेणवड बुद्रुक ता. इगतपुरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!