इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम कावनई येथे मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, सरपंच सुनिता पाटील, पोलीस पाटील निवृत्ती शिरसाठ, चेअरमन शिवाजी शिरसाठ, कचरू शिरसाठ, ग्रामसेवक शरद रहाडे, नंदू पाडेकर, रामभाऊ पाटील, राजाराम शिरसाठ, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. सी. पाटील , प्रा. स्वाती शेळके, प्रा. के. के. चौरसिया उपस्थित होते.
श्री. खातळे आपल्या भाषणात म्हणाले की , विद्यार्थ्यानी शिबिराच्या माध्यमातून चांगल्या सवयी अंगीकारून आपले छंद जोपासणे गरजेचे आहे. जीवनात यश मिळविण्यासाठी कष्ट करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. प्राचार्य भाबड यांनी भाषणात शिबिराचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यानी चांगल्या संस्काराचा आदर्श इतरांसमोर निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. भावी पिढी संस्कारक्षम निर्माण करणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या हाती असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक व कामकाजाच्या अहवालाचे वाचन रासेयोचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. बी.सी. पाटील यांनी केले. सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील निवृत्ती शिरसाठ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती शेळके यांनी केले. आभार वैभव शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला हरीभाऊ पाडेकर, शिवराम शिरसाठ, कृष्णा पाडेकर, तुकाराम झेंडे, नंदू शेलार, राजाराम पाटील, त्र्यंबक क्षीरसागर, प्रकाश पाटील, सचिन शिरसाठ, निलेश शिरसाठ, गणेश शिरसाठ वैभव पाटील, विद्यार्थी व प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.