इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभाग आयोजित वार्षिक जिल्हा बैठक चर्चासत्र घोटी येथे आज संपन्न झाले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व दुर्गसेवक, दुर्गसेविका व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. वनवासी विद्यार्थी वसतीगृह घोटी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व प्रमुख पाहुण्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक करून कार्यालय शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा नेते संदीप किर्वे, गोंदे दुमालाचे माजी सरपंच दुर्गप्रेमी गणपत जाधव, जेष्ठ नेते बाळासाहेब सुराणा, खादी ग्रामोद्योगचे व्हॉइस चेअरमन अनिल भोपे, भास्कर खोसकर, इगतपुरीनामाचे संपादक पत्रकार भास्कर सोनवणे, नितीन शिंदे हजर होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
बैठकीवेळी जिल्हा प्रशासक साईनाथ सरोदे, जिल्हाध्यक्ष गणेश घोटकर, खजिनदार हेमंत भोईटे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख अर्जुन कर्पे, विलास शिंदे, तालुका प्रशासक विकास कोकणे, तालुकाध्यक्ष संतोष कडू, तालुका खजिनदर प्रसाद तांबे, संपर्कप्रमुख शैलेश शेलार, प्रदीप कडु, प्रसिद्धीप्रमुख गणेश गतीर, संघटक भास्कर भगत आदी पदाधिकारी हजर होते. विविध किल्ल्यांवर व्यवस्थापन करण्यासाठी समित्यांची घोषणा यावेळी करण्यात आली. त्रिंगलवाडी किल्ल्यासाठी विकास शर्मा, केरू पिंगळे, विकास कोकणे, विवेक आव्हाड, सुनील उगले, किल्ले कावनईसाठी प्रसाद पाटील, वासुदेव मराडे, संतोष कडू, निलेश फर्डे, किल्ले घारगडसाठी नामदेव नाठे, किरण मते, अर्जुन कर्पे,.प्रसाद तांबे, किल्ले मोरधनसाठी विजय शिंदे, भरत कडू, भास्कर भगत, गणेश गतीर, किल्ले AMK साठी श्रीकांत चव्हाण, ज्ञानेश्वर कडू, प्रदीप कडू, शैलेश शेलार, रामा कडू यांची नियुक्ती करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागातील सर्व दुर्गसेवक, पदाधिकारी, इगतपुरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी दुर्गसेवक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने हजर होते. सूत्रसंचालन हर्ष जाधव यांनी केले.