महत्त्वाची बातमी : बारावीच्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशतः बदल

इगतपुरीनामा न्यूज दि. २४ :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या (एचएससी) परीक्षेत अंशतः बदल करण्यात आला आहे.

मार्च – एप्रिल २०२२ मध्ये होवू घातलेल्या बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकातील दोन तारखांमध्ये तांत्रिक कारणामुळे बदल करण्यात आला असून शनिवार ५ मार्च रोजी घेण्यात येणारा सकाळ आणि दुपार सत्राचा पेपर आता नव्या वेळापत्रकाप्रमाणे मंगळवार ५ एप्रिल रोजी घेतला जाणार आहे, तर सोमवार ७ मार्च रोजी घेण्यात येणारे सकाळ आणि दुपार सत्रातील दोन्ही पेपर आता गुरुवार ७ एप्रिल रोजी घेतले जाणार आहेत. याव्यतिरिक्त वेळापत्रकात असलेले इतर पेपर यापूर्वी जाहीर झालेल्या निर्धारित तारखांनाच घेतले जाणार आहेत.

संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी ह्या बदलाची कल्पना विद्यार्थ्यांना द्यावी, आणि कोणताही परीक्षार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन परीक्षा मंडळाकडून करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षा याआधी जाहीर केलेल्या निर्धारित वेळापत्रकाप्रमाणेच होणार असून त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांनी गोंधळून जावू नये, दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षेच्या आधी संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिले जाणारे छापील वेळापत्रक हेच अंतिम असणार आहे, त्यामुळे वेळापत्रकासाठी संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात संपर्क साधावा आणि अंतिम वेळापत्रकाची माहिती करून घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!