निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य हे जनतेच्या विकासासाठी गरजेचे असून रस्ते हे विकासाचे मुख्य भाग आहे. ते दर्जेदार करणे हे गरजेचे आहे. बेलगाव तऱ्हाळे येथे ५० लाख रुपयांच्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. टाकेद भागातील विविध गावांना वेगवेगळ्या रस्ता कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. टाकेद भागातील जनतेने माझी कायम पाठराखण केली आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात अजून विकास कामे केली जातील असे मनोगत बेलगाव तऱ्हाळे येथे आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, जि. प. सदस्य उदय जाधव, माजी जि. प. सदस्य केरुदादा खतेले, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, बाजार समितीचे नामदेव भोसले, रतन जाधव, डॉ. श्रीराम लहामटे, धामणी सरपंच गौतम भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस खेड गटप्रमुख वसंत भोसले, भाऊसाहेब म्हस्के, काशिनाथ कोरडे, लेखापरीक्षक विष्णु वारुंगसे, महेश गाढवे, पिंपळगाव मोर चेअरमन पंढरीनाथ काळे, तानाजी आव्हाड, बेलगावचे सरपंच अशोक मोरे, उपसरपंच संतोष वारुंगसे, हिरामण आव्हाड, ग्रा.प सदस्य समाधान वारुंगसे, विजय कर्डक, उपअभियंता योगेश गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी मनोगतात आमदार माणिकराव कोकाटे यांचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे मार्गी लावत आहे. सिन्नर तालुक्यातील विकासाबरोबरच टाकेद भागात ही मोठ्या प्रमाणात विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आहे. आमदार कोकाटे यांच्या कार्याची दखल सातत्याने या भागाने केली आहे. आगामी काळात त्यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष नेतृत्व ही गरज असून त्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी असे मनोगत व्यक्त केले.
बेलगाव तऱ्हाळे येथील नळपाणी योजना जलकुंभ, मारुती मंदिर सामजिक सभागृह, व्यायामशाळा आदी कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी केली. यावेळी ग्रामपंचायतच्यावतीने आमदार माणिकराव कोकाटे यांचा सत्कार पांडुरंग वारुंगसे, सरपंच अशोक मोरे, संतोष वारुंगसे यांनी केला. यावेळी उपस्थित मान्यवर पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी ग्रा. पं. सदस्य अंकुश मोरे, समाधान वारुंगसे, सुवर्णा आव्हाड, बबाबाई मोरे, प्रमिला वारुंगसे, पोपट मोरे, संतोष वारुंगसे, संजय आव्हाड, चंद्रकांत आव्हाड, भरत वारुंगसे, रामकृष्ण वारुंगसे, केरू आव्हाड, शिवाजी कड, सोपान वारुंगसे, विठ्ठल वारुगसे, गोरख वारुंगसे, रमेश जगदाळे, लक्ष्मण जगदाळे, चंदू बोराडे, पोपट हेमके, सुरेश कड, भरत आव्हाड, नामदेव शिंदे, शशी बारवकर, नारायण कडवे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.