निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
कावनई येथील कामगारांनी एकत्र येत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व्हॉटस ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊन शैक्षणिक मदत केली. त्यांनी तब्बल ४० हजारांची वर्गणी आपल्या गावातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जमा केली. यापुढेही शैक्षणिक चळवळ पुढे सुरू ठेवण्याचा यावेळी कामगार वर्गाने संकल्प केला. कोविड काळात पालकांचा रोजगार मिळाला नसल्याने पालकांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. पाल्यांना लेखन साहित्य मिळाले नाही. विद्यार्थी कोणत्याच क्षेत्रात मागे राहू नये हीच निकड ओळखून जिल्हा परिषद शाळा कावनई व आंब्याचीवाडी येथील गोरगरिबांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यासाठी कावनई येथील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. सकारात्मक विचार विनिमय करून आपण ज्या शाळेची पायरी चढून नोकरी व कामधंद्यात लागलो त्याच शाळेचे आपण देणे लागतो या आपुलकीच्या भावनेतून शाळेला शैक्षणिक मदत देऊ केली.
ह्यामध्ये ३५० विद्यार्थ्यांना ५०० वह्या, ३५० पेन्सिली, ३५० शाँपनर, ३५० पेन, ३५० खोडरबर शैक्षणिक साहित्य तसेच खेळाचे साहित्य ३ फुटबॉल ३ टेनिस बॅडमिंटन इत्यादी साहित्य अंदाजे २० हजार किंमतीचे साहित्य मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुनिता पाटील, पोलीस पाटील रूपाली शिरसाठ, उपसरपंच द्रोपदाबाई कौटे, ग्रामपंचायत सदस्य किरण रायकर, विनायक शिरसाठ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिगंबर शिरसाठ, आनंदा भांडकोळी, तान्हाजी झेंडे, अशोक पाटील, भगवान कौटे, अक्षय पाटील, हरिश्चंद्र शिरसाठ, दिगंबर पाटील, संतोष कौटे, तुकाराम शिरसाठ, नितीन शिरसाठ, रामदास येथे, बाळू कौटे, मंगेश शिरसाठ, किरण वळवे, शांताराम रंधवे, बॉबी विरणक, नंदू शिरसाठ, कौसाबाई कौटे, ग्रुप ॲडमीन संतोष शिरसाठ, सौ. पटाईत, जितेंद्र अहिरे, खगेश जाधव, विद्या काळे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.