इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आयडीएफसी फर्स्ट भारत बँकेतर्फे उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले. आयडीएफसी बँकेने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असताना उच्च शिक्षण घेत असलेल्या पितृछत्र हरवलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य व्हावे या उद्देशाने महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक सहाय्य सीएसआर फंडातून मंजूर करण्यात आली. यामध्ये कु. धम्मावती देहाडे, कु. दिपाली सांगळे, कु. निशा कातोरे या सर्व एफवायबीए वर्गातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. या विद्यार्थिनींना सीएसआर विभागाचे राष्ट्रीय व्यवस्थापक प्रमुख जॉन पाॅल अशोक व महाराष्ट्र राज्याचे व्यवस्थापक प्रमुख शरद देडे यांच्या प्रमुख हस्ते चेकचे वितरण करण्यात आले.
सामाजिक जबाबदारीतून आर्थिक साहाय्य करणाऱ्या आयडीएफसी बँकेचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी आभार मानले. विद्यार्थिनींना सामाजिक जबाबदारीतून बँकेने मदत केल्याबद्दल विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी व मदत होणार आहे, अशा विद्यार्थिनींना सर्वपरीने आर्थिक साह्य आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले, याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी उपस्थित होते. महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोहन कांबळे यांनी विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रयत्न करून कार्यक्रमाचे आयोजन केले. आयडीएफसी बँकेचे आणि व्यवस्थापकीय प्रमुखांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात आले.