सीएमए आयसीडब्ल्यूए नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी भूषण उत्तम पागेरे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंन्ट्स ऑफ इंडियाच्या नाशिक विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा सीएमए कार्यालय नाशिक येथे पार पडली, यामध्ये २०२९-२३ या ४ वर्षांसाठी निवडून आलेल्या सभासदांची नवीन कार्यकारिणी ठरवण्यात आली. यामध्ये सीएमए भूषण उत्तम पागेरे हे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील तर उपाध्यक्ष म्हणून आरीफखान मन्सूरी व दिपक जगताप यांची निवड झाली. सचिवपदी अर्पिता फेगडे, खजिनदारपदी मयूर निकम यांची नियुक्ती झाली. नवीन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी सीएमएच्या विद्यार्थ्यांसहो सभासदांसाठी विविध उपक्रम राबवण्याची व चर्चासत्रांची घोषणा केली. कार्यालयाकडून विविध महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांमध्यें वाणिज्य क्षेत्राबद्दल जनजागृती केली जाईल अशी घोषणा केली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!