आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण तज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी ह्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुररकार जाहीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व मुख्य संचालक तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण तज्ज्ञ सर डॉ. मो. स. गोसावी ह्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील  उत्कृष्ट योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘जीवन साधना गौरव पुररकार जाहीर झाला आहे. प्रशासकीय सेवेत निवड होऊन सुद्धा सर डॉ. मो. स. गोसावी ह्यांनी ज्ञानदानाचे क्षेत्र निवडले. शिक्षणाला अध्यात्माचे अधिष्ठान असावे व त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी सर आपल्या संस्थेच्या विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहिले आहेत. ग्रामीण, आदिवासी, शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांनी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

उद्या गुरुवार १० फेब्रुवारीला पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यापीठाचा ७३ वा वर्धापन दिन प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्या वेळी हा पुरस्कार डॉ. गोसावी यांना प्रदान करण्यात येणार आहे. सर डॉ. मो. स. गोसावी यांना आतापर्यंत अनेक मास्टर टीचर ऑफ मिलेनियम सारख्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेच्या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सरांचे अभिनंदन केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!