आंतरराष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने स्पर्धा संपन्न

कु. अंजलीकुमारी मदनसिंग पारितोषिक स्वीकारताना

इगतपुरीनामा न्यूज, दि. 1
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागाने आंतरराष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने स्पर्धा आयोजित केली. यातील गणिताचे विविध क्षेत्रातील उपयोग या ऑनलाईन पीपीटी सादरीकरण स्पर्धेत महाविद्यालयातील 11 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी कु. अंजलीकुमारी मदनसिंग हिने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक पुणे येथील अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी खान मारिया असाद हिने मिळविला. ह्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला. गणित विभाग प्रमुख प्रा. जी. टी. सानप यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड होते. याप्रसंगी आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. भाबड यांनी गणित विषयाचे महत्त्व सांगून विविध संधींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. एस. एस. परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. एन. निकम यांनी केले. प्रा. जी. एस. कोल्हे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विधार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    प्रा . देविदास गिरी says:

    बातमी छान आली धन्यवादं .

Leave a Reply

error: Content is protected !!