इगतपुरीत जलशक्ती अभियान संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. 31

गौरव परदेशी यांच्याकडून

इगतपुरी येथील महाविद्यालयात जलशक्ती अभियानावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थीनी.

इगतपुरी येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळांतर्गेत पुणे विद्यापीठाच्या निर्देशनानुसार जलशक्ती अभियान कार्यक्रम घेण्यात आला. या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले तसेच भविष्यकाळात जल संवर्धनाची गरज आहे व त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्राध्यापकांनी संबोधित केले. तसेच कशाप्रकारे जल संवर्धन करता येईल याबाबतच्या उपाययोजनांबाबत प्राचार्य नितीन वामन यांनी मार्गदर्शन केले.तर सद्य स्थितीत सर्वांकडून कशा प्रकारे पाण्याचा उपद्रव होत आहे याचे उदाहरणासह स्पष्टीकरण देऊन हे तातडीने थांबविण्याची गरज असल्याचे व जल संवर्धन किती महत्वाचे आहे हे पटवून देऊन इगतपुरी तालुक्यात असणाऱ्या धरणांबद्दल व धरणांमधील पाण्याचा कशाप्रकारे वापर होतो याबाबत सखोल मार्गदर्शन प्राध्यापक अविनाश कासार यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यासोबतच तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही यावेळी साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य नितीन वामन, प्रा. शशिकांत सांगळे, अविनाश कासार, पी. एस. वारघडे, सर्व विद्यार्थी आदी.उपस्थित होते.