इगतपुरीनामा न्यूज, दि. २
इगतपुरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सतत पाठीशी असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके आहेत. त्यांची निवड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी झाल्याने इगतपुरी पंचायत समितीला अभिमान वाटतो. येणाऱ्या ५ वर्षात गोरख बोडके यांच्या साहाय्याने पंचायत समिती तालुकाभरात जनमानसांना उपयुक्त कामांचा आलेख उभा करील असा विश्वास वाटतो असे कौतुक इगतपुरी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याने पंचायत समितीतर्फे गोरख बोडके यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी गोरख बोडके यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमप्रसंगी इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र पवार, जेष्ठ नेते माजी सभापती रघुनाथ तोकडे, टिटोलीचे सरपंच अनिल भोपे, मोडाळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रामदास बोडके, व्हॉइस चेअरमन रतन मेदडे, चित्रपट निर्माते धनराज म्हसणे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देतांना गोरख बोडके म्हणाले की, आपल्या सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना लोकांची महत्वाची कामे करायची आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीवर घेतले आहे. अधिकाधिक कामे करून लोकांसाठी आनंद निर्माण करण्यासाठी तुमच्यासह मी सदैव कटिबद्ध आहे.