इगतपुरीनामा न्यूज, दि. २
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेला अत्याधुनिक इंटरऍक्टिव्ह पॅनल प्रोजेक्टरचे आज लोकार्पण करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच देवा मोरे आणि गोंदे दुमालाचे माजी सरपंच गणपत जाधव यांच्या विशेष पाठपुराव्यातुन गोंदे औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीच्या साहाय्याने प्रोजेक्टर देण्यात आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. महिंद्रा कंपनीचे अधिकारी सुनील तिडके, संतोष दुसाने, संतोष जाधव यांनी ह्या शाळेला प्रोजेक्टरची मदत केल्याने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. उपसरपंच मनीषा गायकर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम गायकर, अशोक गायकर, दत्तू पावडे, मंगला कोकाटे, अरुण शिरसाठ, लता शिरसाठ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गणपत जाधव यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, शिक्षणाने पुढची पिढी घडू शकते यासाठी सरपंच देवा मोरे यांच्यासह आम्ही शाळेला महत्वपूर्ण साहित्य दिले आहे. लोककल्याणासाठी आगामी काळात आम्ही नेहमीच लोकांच्या सोबत राहून कार्य करण्याची ग्वाही देतो. गोंदे सोसायटीचे माजी चेअरमन विजय नाठें, माजी सरपंच परशराम नाठे यांनीही शाळेचे आणि ग्रामस्थांचे यावेळी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी ग्रामस्थ हिरामण गायकर, माजी सरपंच भाऊसाहेब गायकर, विलास मुसळे, दिनकर गायकर, सुभाष गायकर, नामदेव कोकाटे, ज्ञानेश्वर गायकर, नाना गायकर, तानाजी गायकर, योगेश पाळदे, उत्तम पाळदे, निखिल पागेरे, विलास पागेरे, उत्तम गायकर, माजी सरपंच तुकाराम गायकर, ज्ञानेश्वर गायकर, दादा शिरसाठ, दत्तू गायकर, बन्सी जाधव, विष्णू पागेरे, विठोबा संधान, एकनाथ मुसळे, बळीराम शिरसाठ, निखिल पागेरे, अनिता गायकर, बळीराम शिरसाठ, सरला जाधव, संगीता नाडेकर, कविता मुसळे, भरत गायकर, रोहिदास गायकर, कमल पागेरे, छाया पागेरे आदी हजर होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या मनीषा गायकर, नितीन पगार, विकास मुसळे, निखिल गायकर यांनी सरपंच देवा मोरे आणि माजी सरपंच गणपत जाधव, महिंद्रा कंपनीचे आभार मानले. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बालशिंग परदेशी, नितीन पवार, सागर जळगावकर, राजू सोळंकी, छायावती देवरे, अशोक मोरे, उमेश बैरागी, भारती माठे, राजेंद्र पवार यांनी उपस्थितांचे आभार मानून यापुढेही शाळेला साहाय्य करण्याचे आवाहन केले.