जय स्वाभिमानी कुंभार समाज विकास संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी  राहुल शिंदे

सुनील शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

कुंभार समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि प्रगतीसाठी अविरतपणे लढा देणाऱ्या स्वाभिमानी कुंभार समाज विकास संस्थेची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यामध्ये नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी समाजाचे चळवळीचे  कार्यकर्ते राहुल शिंदे यांची सर्वानुमते निवड झाली. या निवडीचे कुंभार समाजाने स्वागत केले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण कुंभार यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी नाशिक जिल्हा संघटनेमध्ये फेरबदल  केले असून नूतन कार्यकारणी निवड केली आहे. नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी राहुल अशोक शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा सरचिटणीस भरत  जगदाळे, रमेश राजपुरे, रमेश सोनवणे, नवनाथ वाघचौरे, किशोर कोते, गणेश वाघचौरे, सोपान वाघचौरे, गणेश जाधव, मच्छिंद्र वाघचौरे, बाबुराव वाघचौरे, चंद्रकांत जाधव आदींनी
स्वागत केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!