
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
कोरोनाचा उद्रेकामुळे इगतपुरी तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिसते आहे. आज संपूर्ण तालुक्यात फक्त १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत २०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरगुती विलगीकरणात उपचार घेत असून फक्त 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय संस्थांच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी ‘इगतपुरीनामा’ सोबत बोलतांना दिली.
इगतपुरी तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायती सक्रीयतेने काम करीत आहेत. नागरिकांनी बेशिस्त वागणूक केल्यामुळे फैलाव वाढत असल्याने अन्य लोकांचा जीव धोक्यात घालू नये असे जाणकार सांगतात. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी.