इगतपुरीनामा न्यूज, दि. 25 ( सुनिल बोडके, त्र्यंबकेश्वर )
त्र्यंबकेश्वर शहरासह ग्रामीण भागात कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना जनतेला सामोरे जावे लागत आहे. त्यात त्र्यंबकला अतिदक्षता सुविधा नसल्याने नाशिकला बेड उपलब्धतेविषयी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी दमछाक होते. या सोबत ऑक्सिजनच्या तुटवड्यासह बेड न मिळणे, बेड मिळाला तर रेमडीसीवीर इंजेक्शनचा प्रश्न समोर उभा रहातो. अशा अनेक संकटातून रुग्ण व त्याच्या घरात झालेले इतर पॉझिटिव्ह रुग्ण यांचे अतोनात हाल होत असतात. त्यामुळे त्र्यंबक शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलासा मिळवून दिला आहे. किमान रुग्णालयात बेड मिळेपर्यंत रुग्णांची ऑक्सिजन लेवल खाली जावु नये, म्हणुन रुग्णाला तातडीने ऑक्सिजन मिळणे आवश्यक असते. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, त्यांचे सहकारी कैलास मोरे, अब्दुल मन्सुरी, निलेश पवार, विजय गांगुर्डे, प्रशांत लोंढे, गणेश मोरे यांनी नगरपरिषदेकडे ३ ऑक्सिजनचे मोठे सिलिंडर उपलब्ध करून दिले आहे. सिलेंडर संपल्यास ते पुन्हा भरूनही दिले जाईल असे पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले. यावेळी मदत कक्षातील बाळासाहेब सावंत, सुरेशतात्या गंगापुत्र, पोलीस निरीक्षक रणदिवे, नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, पप्पु शेलार, संतोष कदम, दिलीप चव्हाण, किरण चौधरी, दिलीप पवार, सुनिल लोहगावकर, मनोज खैरनार, रामचंद्र गुंड यांच्याकडे सिलेंडर सुपूर्द करण्यात आले.