हरसुलला मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराला प्रचंड प्रतिसाद : विनायक माळेकर यांच्यातर्फे मोफत चष्मे वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागांत प्रथमच मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला. गरजूंनी शिबिराचा लाभ घेऊन तपासण्या केल्या अशी माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजि. विनायक माळेकर, युवा नेते मिथुन राऊत यांनी दिली. हरसूल येथे तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या मार्फत खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून आज हरसूल ग्रामपंचायत हॉलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटक म्हणून खासदार हेमंत गोडसे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हिरामण खोसकर, प्रमुख पाहुणे म्हणून हरसूल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या इंजि. रुपांजली माळेकर उपस्थित होते. हरसूल भागात प्रथमच भव्य नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने रुग्णांनी मोठ्या संख्येने शिबिरासाठी उपस्थित राहून तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. यावेळी आयोजक इंजि. विनायक माळेकर, शिवसेना तालुका समन्वयक समाधान बोडके, युवा नेते मिथुन राऊत, भास्कर खोसकर, हरसुलच्या सरपंच सविता गावित, उपसरपंच राहुल शार्दूल, नितीन देवरगावकर, अशोक लांघे, सुरेश गायकवाड, योगेश आहेर, चिंचवडचे सरपंच भगवान बेंडकोळी, लक्ष्मण वाघेरे, आंबादास बोरसे, सुरेश झोले, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग टोपले, मारुती धनगर, मोहन कनोजे आदींसह पदाधिकारी आणि हरसुल गणातील नागरिक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!