
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
विपश्यना, ध्यानधारणा, योगसाधना धावपळीच्या व्यस्त जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. महाविद्यालयीन युवकांनी आपल्या जीवनात याचा अंगिकार केल्यास शांतता लाभून अभ्यासासाठी एकाग्रता मिळविता येते असे प्रतिपादन योगअभ्यासक महेंद्र गायकवाड यांनी केले.
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय विपश्यना कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड होते. उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. श्रीमती ए. बी. धोंगडे, प्रा. आर. एम. आंबेकर उपस्थित होते.
श्री. गायकवाड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, जीवनात करियर घडवितांना योग्य मार्गदर्शन, दिशा मिळणे आवश्यक असून यासाठी विपश्यनेची आवश्यकता आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अभ्यासाबरोबरच महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन व्यक्तिमत्त्व घडवावे असे आवाहन केले. प्रारंभी रसायनशास्त्र विभागातील प्रा. श्रीमती ए. बी. धोंगडे यांनी प्रास्ताविक केले . दोन दिवसिय कार्यशाळेत श्री. गायकवाड यांनी प्रात्यक्षिके व व्याख्यानातून मार्गदर्शन केले. रसायनशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. श्रीमती एस. ए. हाडंगे यांनी मानले. प्रा. एच. आर. वसावे, प्रा. डी. के. भेरे, प्रा. महाले, प्रा. श्रीमती एस. एम. पवार, प्रा. श्रीमती शेळके , प्रा. श्रीमती भोर, प्रा. श्रीमती दुगजे, प्रा. जी. एस. लायरे व विद्यार्थी उपस्थित होते.
2 Comments