माणिकखांब येथील २ युवक मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केली अपघातग्रस्तांना मदत

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलने शाळेचा बसला पाठीमागून धडक दिल्याने आज अपघात झाला. आज सकाळी ८ वाजता ही घटना सॅमसोनाईट गोडाऊन समोर झाली. या अपघातात माणिकखांब येथील दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांचा जीव बचावला. गणेश दादू चव्हाण वय 20, संजय बाळू चव्हाण वय 22 हे दोघे मोटार सायकलवरून नाशिकच्या दिशेने चालले होते. पुढे उभ्या असणाऱ्या शाळेच्या बसला त्यांनी पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!