कवयित्री : सौ. प्रज्ञा घोडके, चिंचवड, पुणे 9604557689
ऋतू घननीळ सांज
अशी झाकोळूनी आली,
ऋतू गर्द आठवांची
खूण नयनात ओली…! १.
मम स्नेहार्द झर्यांनी
वेड असे लावियले,
कृतकृत्यतेत बध्द!
दु:ख सारे क्षीण झाले…! २.
करी स्तिमित सूर्यास्त
अन..आसक्त हे मद!,
जीव जीवाला लावूनी
वायु वाहे मंद-मंद…! ३.
सांजवारे वाहताना
मनोमनी उमलले,
अता कांचनसंध्येत
स्वर्णरंग उधळले…! ४.
जाई घेऊनी सांज ही
मधुस्वप्ने नयनात,
अन..ढळताना वेडी
विखुरेल सुवर्णात….! ५.
कविता संकलन : नवनाथ अर्जुन पा. गायकर ( पत्रकार आणि साहित्यिक )