नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. १
देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा नवा जीवाणू ओमायक्राँनचा शिरकाव होत असतानाच केंद्र आणि राज्य शासन या विषाणूचा जास्तीत जास्त फैलाव होऊ नये यासाठी नवे नवे निर्बंध घोषित करत आहेत. यासाठी नागरिकानींही सजग व दक्षता घेण्याचे आवाहन करत आहे. यासाठी कठोर निर्बंध ही लादले जात आहे. मात्र काही विशेष घटना पाहिल्यानंतर हे नवे निर्बंध केवळ सामान्य जनतेसाठीच आहे का ? कायदे करणाऱ्या लोकप्रतिनिधीसह भांडवलदार बड्या लोकांना यापासून सवलत देण्यात आली आहे का ? या बड्या धेंडावर कारवाई का नाही ? असे संतप्त सवाल जागृत नागरिक करत आहेत.
मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील विल्होळी नजीकच्या एका मॉलमध्ये आज चक्क तोबा गर्दी उसळल्याचे दिसून आले. यातही कोरोनाच्या प्रतिबंधासाठी बनवण्यात आलेले कुठलेही नियम कुणीही पाळताना दिसत नसल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले आहे. बऱ्याच ग्राहकांच्या तोंडावर मास्कही नसताना कोणालाही कुठेही अटकाव न करता बिनधास्त प्रवेश दिला जात असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे कोरोना नियमाचे पालन न करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर, दुकानदार यांचेवर तातडीने दंडात्मक कारवाई करणाऱ्या तत्पर प्रशासनाचे बड्या धेंडावर मात्र मेहेरनजर का ? नियमाची ऐशीतैशी करणाऱ्या बड्या धेंडावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ का ? संबंधितांना यातून सवलत आहे का ? असा संतप्त सवाल नागरिक करत आहे. अंत्यविधी, लग्न यासाठी फक्त ५० लोकाची उपस्थिती बंधनकारक करणाऱ्या प्रशासनास मॉल, सुपर मार्केटमधील तोबा गर्दी दिसत नाही का ? नुकतेच नगर जिल्ह्यातील एका बड्या नेत्यांच्या मुलांच्या लग्नात हजारो वऱ्हाडी उपस्थित असताना ही कोणावर कारवाई नाही ? सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुलीच्या लग्नातही अशीच सवलत देण्यात आली होती ?एकुणच कायदे फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच लागु होतात का ? बड्या धेंडाना यातून सवलत आहे का ? हा दुजाभाव करण्यामागे प्रशासनाची भुमिका नेमकी काय ? की तोंडे पाहुन काम करण्यात प्रशासन ही वाकबगार झाले आहे का ? मग नियम, निर्बधाचा देखावा तरी का ? असे अनेक सवाल नागरिक करत आहेत. दरम्यान आता विल्होळी येथील संबंधित मॉलवर दंडात्मक कारवाई होतेय का ? की प्रशासन यावर मेहेरबानच असणार आहे ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.