इगतपुरीनामा न्यूज, दि. १
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध सुविधा आणि विषयांची माहिती व्हावी म्हणुन इंडक्शन प्रोग्राम अतिशय उपयुक्त ठरतो असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अध्यक्षीय भाषणातून केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाची भुक असल्यास महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे यावे. आमचे प्राध्यापक नेहमीच प्रेमळ भावाने विद्यार्थ्यांना सहकार्य व मदत करत असतात. मात्र विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन सुविधांचा लाभ घ्यावा. यावेळी प्रा. संदीप गोसावी, डॉ. संदीप माळी, प्रा. नीता पुणतांबेकर, डॉ. अजित नगरकर, प्रा.किरण शिंदे, प्रा. समाधान गांगुर्डे, प्रा. डॉ. दिनेश उकिरडे आदी प्राध्यापकांनी आपापल्या विभागाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. सुत्रसंचालन प्रा.संदीप गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.समाधान गांगुर्डे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांसह महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम वर्ष वर्गाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.