
इगतपुरीनामा न्यूज – भावली धरणात आज शुक्रवारी दुपारी देवळे ता. इगतपुरी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला आहे. भावलीचे पोलीस पाटील जगन्नाथ आगिवले यांनी इगतपुरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. दिनेश जनार्दन लायरे, वय ३५, रा. देवळे, ता. इगतपुरी असे धरणात सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होता. सगळीकडे त्याचा शोध सुरु असतांना भावली धरणात त्याचा मृतदेह सापडला आहे. याबाबत इगतपुरी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.