दोन वेगवेगळ्या अपघातात ५ जण जखमी : जगद्गुरू नरेंद्राचार्य मोफत रुग्णवाहिकेकडून अपघातग्रस्तांना मदत

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

मुंबई आग्रा महामार्गावर आज दोन अपघात झाले. दोन्ही अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे जखमींचा प्राण बचावला.

पहिला अपघात आज साडेचार वाजता झाला. घोटीकडून नाशिककडे जात असताना वाडीवऱ्हे भागातील दत्त मंदिराजवळ गाय आडवी आल्याने मोटरसायकल जोरदार धडकली. यामध्ये आदित्य प्रभाकर गायकर वय 18, मंगल प्रभाकर गायकर वय 35 रा. खंबाळे ता. इगतपुरी हे दोघे जखमी झाले. दुसरा अपघात पाडळी फाट्याजवळ साडेपाच वाजता झाला. नाशिककडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये हरिश्चंद्र महादू कामडी वय 38, रा. विहिगाव जि. ठाणे, नारायण गंगाराम ठोंबरे वय 30 रा. पाडेगाव जि. ठाणे, बाळा काशीनाथ वारे वय 28 रा. पालघर हे तिघे जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे जखमींचा प्राण बचावला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!