श्री. विठोबा दिवटे पाटील, नांदूरवैद्य
नाशिक जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात “लोकनेते गोपाळराव गुळवे “नावाची “तटबंदी” होती..ह्या तटबंदीच्या उभारणीत अनेक महत्वाचे दगड होते..मात्र हे सर्वच दगड कधीही दिसून येत नाही..असाच त्या पायाच्या उभारणीत एक मोलाचा दगड होता..अन तो म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी.. नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष.. बांधकाम समितीच्या सभापती.. कृषि उत्पन्न बाजार समिती घोटीच्या माजी सभापती.. श्रीमती इंदुमती गोपाळराव गुळवे तोही दगड आज निखळून पडला…आज दुपारी अल्पशा आजाराने त्यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले… स्वर्गीय लोकनेते गोपाळराव गुळवे राजकारणात.. समाजकारणात आपली उभी हयात वावरताना..त्यांच्या पश्चात आपला कुटुंबाचा भार पेलत...आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे पवित्र अन मोलाचे काम ह्याच माऊलीने केले...अन हे करत असतांना फक्त चूल अन मूल एवढंच आपलं कार्यक्षेत्र न मानता..स्वर्गीय गुळवे दादांच्या खांद्याला खांदा लावत,त्यांची प्रत्यक्ष सोबत करत..समाजकारण अन राजकारण सुद्धा केलं..नाशिक जिल्ह्यातील अनेक संस्था सांभाळत,जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची यशस्वी कारकीर्द पार पडली...अन आपल्या कारकिर्दीत सर्वसामान्य लोकांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या...कृषि उत्पन्न बाजार समिती घोटीच्या सभापती पदावर सलग सात वर्षे काम करतांना, अनेक पायाभूत सुविधांची उभारणी केली...शेतकऱ्यांना ,व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला... अन आपण एक महिला असून सुद्धा कोणत्याही क्षेत्रात त्या कधीही मागे राहिल्या नाहीत..स्वर्गीय गुळवे दादांच्या अचानक अपघाती निधनानंतर मोठ्या दुःखात सुद्धा पदर खोचून,आपला मुलगा संदीप गुळवे यांना सुद्धा राजकीय क्षेत्रासाठी ,समाजकारणासाठी उतरून,तालुक्याची सेवा करण्याचा उपदेश केला...
अशा ह्या माऊलीचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले…तालुक्याच्या राजकीय इतिहासात त्यांचे योगदान,विसरणे अशक्य आहे..ह्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली…