स्टुडंड ऑलम्पिक असोसिएशन स्पर्धेत किशोर पाटोळेचे घवघवीत यश आणि नॅशनल स्पर्धेसाठी निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

सिन्नर तालुक्यातील आशापुर टेंभूरवाडी येथील सामान्य शेतकरी सुभाष पाटोळे यांचा मुलगा किशोर पाटोळे याने सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या स्टुडंड ऑलम्पिक  असोसिएशन या धावण्याच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व करत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक पटकावत राज्यामध्ये तालुक्यासह गावाचे नाव उंचावल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे.
या स्पर्धेत त्याला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुढील स्पर्धेसाठी देशपातळीवर निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. आपला मुलगा आपले स्वप्न पूर्ण करत असल्याचे पाहून आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. किशोरला लहानपणापासून इंडियन आर्मीचे  प्रचंड आकर्षण आहे. याचे स्वप्नच आहे की एक दिवस आर्मीचा गणवेश घालायचाच त्यासाठी तो प्रचंड  मेहनत करतोय.किशोरच्या या कामगिरीने तालुकाभरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, परंतु देश पातळीवरच्या स्पर्धेत नक्कीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील. माझ्यासाठी माझ्या आई वडिलांचे स्वप्न खूप महत्त्वाचे आहे. एक दिवस इंडियन आर्मीचा गणवेश घालायचा आहे. यासाठी खूप मेहनत घेतोय. नॅशनलची निवड माझ्या साठी खूप मोठी गोष्ट आहे. या स्पर्धेत चांगले यश आणि माझे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.
-किशोर पाटोळे, स्टुडंड ऑलम्पिक असोसिएशन चॅम्पियन

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!