कवयित्री – सौ. प्रिया गौरव भांबुरे, तळेगाव दाभाडे, पुणे
मुलीला पण माना वंशाचा दिवा
कशाला फक्त मुलाचा हट्ट हवा
मुलगी ही असते सर्वगुण संपन्न
तिच्यामुळे उजळून निघतो आपण
मायेचा ओलावा, प्रेम असते अपार
हिच्यामुळे घरात आनंद येतो फार
पहिली मुलगी म्हणजे धनाची पेटी
भाग्यवान तोच ज्याच्या जन्मते पोटी
सांभाळावे तीला करू नका माती
मुलांच्या हव्यासापायी विझवूू नये पणती
मुलगी म्हणजे भार नसतो बापाला
परक्याचं धन म्हणून हरवतो आजच्या आनंदाला
काही शब्दांत नाही मांडता येत कहाणी
ठेव विचार डोक्यात हीच पाजेल पाणी
म्हणून तर म्हटलं,
मुलीला पण माना वंशाचा दिवा
तीच नसेल जगात तर मिळेल का विसावा ?
कवितांची निवड आणि संकलन साहाय्य : प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार नवनाथ अर्जुन पा. गायकर