सुभाष कंकरेज, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नासिकच्या मार्गदर्शनाने नाशिक जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी संघटनेची जिल्हा कार्यकारीणी बिनविरोध निवडण्यात आली. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या पुढाकाराने नाशिक जिल्हा परिषदेत प्रथमच नव्याने जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी संघटनेची निर्मिती झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
नव्या कार्यकारिणीत अध्यक्ष राजाभाऊ जाधव, कार्याध्यक्ष महेंद्र पवार, सरचिटणीस निवृत्ती बगड, कोषाध्यक्ष प्रदीप बागुल, उपाध्यक्ष नितीन पवार, उपाध्यक्ष छाया पाटील, संघटक सचिन विंचूरकर यांचा समावेश आहे. नुतन कार्यकारिणीला नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन, नाशिकचे अध्यक्ष उत्तम बाबा गांगुर्डे, उपाध्यक्ष रविंद्र बापू थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, प्रसिद्धी प्रमुख सुभाष कंकरेज, महिला संघटक प्रमुख पुजा पवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.