इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने असंख्य शिवसैनिक आजही भारावुन जात आहेत. त्यांच्या विचाराने आम्ही ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करून आम्ही सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम करीत आहे. त्यानुसार परिसराचा विकास करणे हाच आमचा ध्यास आहे. यासाठी आम्ही सदैव तत्पर राहु असे प्रतिपादन राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर यांनी केले. भरविर, टाकेद, परदेशवाडी येथे हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेबांना मानवंदना देण्यात आली. त्याप्रसंगी खंडेराव झनकर बोलत होते.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार राजाभाऊ वाजे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, उपतालुकाप्रमुख हरीभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना वाहण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, खेड गटप्रमुख साहेबराव झनकर, राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, उपतालुकाप्रमुख हेमंत झनकर, समाधान वारुंगसे, सुदाम भोसले, भाऊसाहेब वाजे, सरचिटणीस राधाकिसन झनकर, गण प्रमुख भीमराव साबळे, शिवाभाऊ काळे, राजाभाऊ घोरपडे, कैलास गाढवे, गटप्रमुख रामचंद्र परदेशी, बहिरू केवारे, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव झनकर, सरपंच गणेश टोचे, ताराबाई बांबळे, शिवाजी गाढवे, ज्ञानेश्वर मोंढे, साहेबराव बांबळे, दिलीप पोटकुले, अशोक बोराडे, गुंजाळ सर, दत्तू पा. झनकर, योगेश जुंद्रे, शिवाजी जुंद्रे, योगेश रायकर, प्रकाश आंबेडकर, तुकाराम झनकर, गोरख मदगे, शिवसेना शाखा प्रमुख, उपशाखा प्रमूख यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.