इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले करिअर घडवावे. जीवनाला चांगली दिशा देऊन देशाची सेवा या माध्यमातून करावी असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. गोपाळ लायरे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यानी चांगले ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करावा. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी विविध स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. प्रारंभी करिअर कट्टा या उपक्रमाचे समन्वयक प्रा. गोपाळ लायरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. डी. के. भेरे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. यू. एन. सांगळे, प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. डॉ. के. एम. वाजे, प्रा. एस. बी. फाकटकर, प्रा. व्ही. डी. दामले, प्रा. जी. डब्ल्यू. गांगुर्डे, प्रा. एस. एम. चव्हाण, प्रा. आर. आर. जगताप, प्रा. एम. आर. धेबडे व विद्यार्थी उपस्थित होते.