इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी तालुक्यात कोरोना आपले भयंकर स्वरूप दाखवायला लागला आहे. एकलव्य आश्रमशाळेतील बाधित शिक्षकांच्या संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आज १९ विद्यार्थिनी आणि ६ विद्यार्थी कोरोना पॉझिविव्ह आढळून आले आहेत. यासह तालुक्यात आज एकूण ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात ६२५ पेक्षा जास्त नमुने तपासणी करण्यात आले आहेत. काही विद्यार्थ्यांना किरकोळ लक्षणे असून गंभीर लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वांवर आवश्यक उपचार सुरू केल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख सांगितले.
इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण रोज वाढत आहे. शिक्षक बाधित असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभागाने एकलव्य आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली. ह्यामध्ये १९ विद्यार्थिनी, ६ विद्यार्थी कोरोनाने बाधित झाल्याचे आज निष्पन्न झाले. इगतपुरी तालुक्यात आज दिवसभरात एकूण ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने संकट गडद होत आहे. काही विद्यार्थ्यांना किरकोळ लक्षणे असून त्यांच्यावर उपचार करून त्यांच्यासह गंभीर लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत २६० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील नागरिकांनी आता कोरोना गंभीरपणे घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group
2 Comments