संदीप किर्वे यांचे जीवनदायी दातृत्व ; कोविड सेंटरला दिले १० ऑक्सीजन सिलेंडर

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25 ( वाल्मीक गवांदे, इगतपुरी )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा लॉयन फांऊडेशनचे संस्थापक संदीप किर्वे यांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला १० ऑक्सीजन सिलेंडर दिले.  यामुळे अनेक रुग्णांचा जीव वाचवण्यास हातभार लागणार आहे. आगामी काळात बेड आणि लागणारी अत्यावश्यक उपकरणे सुद्धा पुरवणार असल्याचे संदीप किर्वे यांनी सांगितले. जीवनदायी ऑक्सिजन सिलेंडर दिल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना संजीवनी मिळाली असल्याने नागरिकांनी श्री. किर्वे यांचे आभार मानले आहेत.
गेल्या आठवड्यात ग्रामीण रुग्णालय व कोरपगांव येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन बेड वाढवावे या मागणीचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिले होते. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांनी ऑक्सीजन सिलेंडर नसल्यामुळे बेड वाढवता येत नाही असे सांगितले होते. त्यानुसार मनसेचे डॉ. प्रदीपचंद्र पवार यांच्यासह स्वतःच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे  यांनी खर्चाचा सदुपयोग केला. त्यांनी ग्रामीण रुग्णालयाला २० ऑक्सिजन सिलेंडर देण्याचे ठरवललेले असून त्यापैकी आज १० ऑक्सीजन सिलेंडर दिले. उर्वरीत सिलेंडर पुढील आठवड्यात देण्याचे सांगण्यात आले. संदीप किर्वे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या धामधुमीत साजरा होतो. मात्र कोरोनामुळे किर्वे यांनी वाढदिवसाला होणाऱ्या खर्चाला फाटा दिला. त्यातूनच कोविड सेंटरला मदत करण्याचा संकल्प केला.
तालुक्यात कोविड रुग्णांची वाढल्याने कोविड रूग्णांना ऑक्सीजन बेड मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकांना खाजगी हॉस्पिटलचा खर्च परवडत नसल्याने त्यांची आर्थिक कुचंबना होते. संदीप किर्वे यांनी सांगितले की, ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला ऑक्सीजन बेडसह अत्यावश्यक उपकरणे लॉयन फाउंडेशन व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात येईल अशी ग्वाही दिली. त्यांच्या या कामगिरीबद्दल तालुक्यातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, मनसेचे तालुकाध्यक्ष मुलचंद भगत, मनवीसे तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, घोटी शहराध्यक्ष निलेश जोशी, इगतपुरी उप शहराध्यक्ष राज जावरे उपतालुकाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, शहराध्यक्ष सुमित बोधक, महिला तालुकाध्यक्ष पुनम राखेचा, घोटी मनविसे उपतालुकाध्यक्ष पिंटू चव्हाण, शहर उपाध्यक्ष राजु राखेचा, अर्जुन कर्पे, निलेश बुधवारे, धीरज गौड, मनसे रेल्वे इगतपुरी युनिट अध्यक्ष शत्रुघ्न भागडे, दिलीप लहाने, समीर शेख, रवी भागडे, गौरव सोनवणे, निलेश कराड, अविनाश कडु, एस. के. परीवार आदी उपस्थित होते.

तालुक्यातील सर्वच सधन नागरिकांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाच्या बदल्यात कोविड सेंटरला अत्यावश्यक उपकरणाचे साहित्य दिल्यास रुग्णांच्या उपचारासाठी नक्कीच दिलासा मिळेल. त्याचप्रमाणे महामारीच्या या काळात तालुक्यातील कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातुन कोविड सेंटरला मदत केल्यास रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा केल्याचे समाधान मिळेल.
संदीप किर्वे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष
                      

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!