उंबरकोनला कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28

कोरोनाच्या वाढत्या प्रभावाबरोबरच लसीकरणाबरोबरच सुज्ञ नागरिकांचा कल आता लसीकरणाकडे दिसतो आहे. काळूस्ते आरोग्य केंद्र व उपकेंद्र उभाडे अंतर्गत मंगळवारी लसीकरण उत्साहात पार पडले. नागरिकांनी ४५ वर्षे पूर्ण असलेल्या तसेच अत्यावश्यक सेवा ( फ्रंट लाईन वर्कर ) असलेल्या नागरिकांनी लसीचा डोस घेतला. नागरिकांनी कोविशील्ड लसीचा पहिला तर काहींनी दुसरा डोस घेतला.

लसीकरण सत्रास डॉ.एस. एस. कोळी, डॉ. एन. पी. बडगुजर, आरोग्य सहाय्यक श्रीमती लॉड्रीक, आर. एस. आवारी, आरोग्य सेविका व्ही. डी. गुजर, ए. एल. गवळी, आर. बी. पाटील, एस. एस. दिंडे, एम. जे. गावित, एस. एस. तोकडे, वाय. जी. मोसे, एन. व्ही. बोराडे, शीला भोसले, जे. एस. सारूक्ते, अंगणवाडी कर्मचारी बी. जी. शिंदे, जयश्री बोराडे, आदींचे योगदान लाभले. शिबीराकामी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते आदींनी सहकार्य केले