‘शिक्षक ध्येय’ मासिक शिक्षकांना दिशादर्शक : गिरीश सरोदे

आदिवासी विकास भवन येथे शिक्षक ध्येयच्या महिला विशेषांकाचे प्रकाशन करतांना अपर आयुक्त गिरीश सरोदे, मधुकर घायदार.

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
महिला दिन विशेषांकाचे प्रकाशन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिक्षक ध्येय प्रकाशनामार्फत प्रकाशित करण्यात आलेला महिला दिन विशेषांक शिक्षकांसाठी आवश्यक असलेल्या माहितीने परिपूर्ण आहे. यात राज्यातील कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित ४६ महिलांची फोटोसह माहिती देण्यात आली असून प्रत्येक शिक्षकांना दिशादर्शक असा हा अंक आहे. राज्यातील शिक्षक एकत्र येत हे मासिक सुरू करणे हा एक अनोखा शैक्षणिक प्रयोग आहे, असे गौरवोद्गार सरोदे यांनी काढले.
नाशिक येथील आदिवासी विकास भवनातील आयुक्तांच्या दालनात प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक आयुक्त हेमलता गव्हाणे, सहायक प्रकल्प अधिकारी ( शिक्षण ) वर्षा सानप, सहायक प्रकल्प अधिकारी ( नियोजन ) अनिता दाभाडे आणि शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार उपस्थित होते.