इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी राहुल जाधव, किरण बऱ्हे, प्रदिप भोसले, अनिल भोसले या विद्यार्थ्याची निवड सैन्य दलात झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, संचालक भाऊसाहेब खातळे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदींनी अभिनंदन केले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना, प्लेसमेंट सेल, क्रीडा विभाग यांच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी याबद्दल मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, अध्यापन याबरोबरच नोकरी आणि व्यवसाय विषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रा. एस.एस. परदेशी, प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. जी. एस. लायरे, क्रीडा संचालक प्रा. एच.आर. वसावे, प्रा. पी. एस. फुलारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

