वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
घोटी टोल नाक्यावर इगतपुरी तालुक्यातील बेरोजगारांना कामावर घ्यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी यांनी अनेक वेळा निवेदन देऊन केली आहे. मात्र टोल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर आज भाजपचे युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, रविंद्र गव्हाणे व पदाधिकारी यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत स्थानिकांना रोजगार देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा पवित्रा भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर यांनी घेतला आहे.
तालुक्यात अनेक युवा बेरोजगार असुन स्थानिकांना डावलुन तालुक्यातील कंपन्या व टोल प्लाझा प्रशासन तालुक्याबाहेरील युवकांना रोजगार देत असल्यामुळे तालुक्यात बेरोजगारी व अर्थव्यवस्था कोलमडुन पडली आहे. यामुळे तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी टोल प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली. याबाबत टोल प्रशासनाने आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याशी चर्चा करून स्थानिक युवकांना टोलप्लाझा येथे कामावर घेवु असे आश्वासन दिले होते. मात्र टोल प्रशासनाने बाहेरून आणलेले कामगार कमी न करता दिवसेंदिवस बाहेरच्या कामगारांची संख्या वाढवत आहे. स्थानिक युवकांची दिशाभुल केली जात असल्याने भुमिपुत्रांच्या रोजगारासाठी टोल प्रशासनाने पुढाकार घेण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात यावे अन्यथा आमरण उपोषण सुरूच राहील अशी भुमिका योगेश चांदवडकर यांनी घेतली आहे.
याप्रसंगी भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रविंद्र गव्हाणे, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष रविंद्र भागडे, किसान मोर्चा सरचिटणिस बाळासाहेब आमले, सजन नाठे, भुषण माळी, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस भाऊसाहेब धोंगडे, आकाश शेलार, महिला आघाडी जिल्हा नेत्या वैशाली आडके, महिला आघाडी तालुकाध्यक्षा आशा थोरात आदी उपस्थित होते.