इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील कु. तेजस चंद्रकांत भागडे याने राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य दाखवले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे आयोजीत राष्ट्रीय बेंचप्रेस स्पधेंत त्याने रजत पदक ( सिल्व्हर मेडल) मिळवून संपूर्ण देशात २ रा येण्याचा मान पटकावला आहे. राष्ट्रीय स्तरावरील वर्ल्ड पॉवर वेटलिफ्टींग इंडीया संघटनेच्या वतीने ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ८५ किलो वजनी गटात तेजस भागडे याने प्राविण्य दाखवले. नांदगाव सदो येथील माजी सरपंच कै. दादापाटील भागडे यांचा तो नातू असून वडील चंद्रकांत भागडे पोलीस दलात कार्यरत आहेत. इगतपुरी तालुक्यात तेजस भागडे याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तेजस भागडे ह्याला लहानपणापासून व्यायामाची आवड आहे. वडील पोलीस खात्यात असल्याने दर ५ वर्षाने बदली व्हायची. जाईल त्या ठिकाणी तो आपली व्यायामाची आवड जोपासत आला आहे. गेल्या वर्षी त्याने जिम प्रशिक्षकाचा कोर्स पूर्ण केला. आशय रानडे यांच्या अकॅडमीची माहीती रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने ६ महिने सराव केला. काही महिन्यांपूर्वी त्याला जिल्हा स्तरावर सुवर्ण पदक मिळाले आहे. राष्ट्रीय पातळीवर दुसरा आल्याने इगतपुरी तालुक्याचे नाव देशभर उंचावले असल्याची प्रतिक्रिया सरपंच परिषदेचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली. माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, माजी सभापती विष्णू चव्हाण आदींनी पदाधिकाऱ्यांसह तेजस भागडे याला शुभेच्छा देऊन सन्मानित केले.