इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
राज्यस्तरीय सब ज्युनियर कुस्ती स्पर्धेत भरविर खुर्दचा भूमिपुत्र पहिलवान बाळू शिवाजी जुंदरे यांने 65 किलो वजनी गटात प्रतिस्पर्धी मल्लांना आस्मान दाखवले. बाळू जुंदरे हा गुरु हनुमान आखाडा साकूरफाटा या आखाड्यातील कुस्तीपटू आहे. पुणे येथील मामासाहेब मोहळ तालीम संघ येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत त्याने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. उत्तरप्रदेशातील नोएडा येथे 2 ते 4 एप्रिल 2021 ला होणार्या देश पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धेसाठी बाळूची निवड झाली आहे. प्रसिद्ध पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे यांचा तो पट्टशिष्य असून इगतपुरी तालुक्यात बाळू जुंदरे याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बाळू जुंदरे याने इगतपुरी तालुक्यासह भरविर खुर्दचे नांव यानिमित्ताने देशपातळीवर चर्चेत आणले आहे. दोन दिवसापूर्वीच भरविर खुर्द येथील कु.जयश्री उत्तम टोचे हिनेही पोहण्याच्या प्रकारात देशपातळीवर तृतीय क्रमांक मिळवून गावाचे नाव उज्वल केले आहे. कुस्ती या अस्सल देशी समजल्या जाणार्या क्रीडा प्रकारात भरविर खुर्दचे नांव राज्यासह देशभरात पोहोचवणार्या पहिलवान बाळू जुंदरे याला प्रवीण सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
15 Comments