कवी : जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७/ ७०८३२३४०२१
रानोमाळ हिरवाई,
साजती डोंगरावरी !
हिरवागार शालू,
शोभतसे भरजरी !!
निसर्गाची नवलाई,
दिसे पहा शेतावरी !
सप्तरंगी इंद्रधनु,
गोल दिसे नभावरी !!
वारा वाहे रानमाथा,
पडे पावसाच्या सरी !
मधी सूर्याची तिरीप,
रान दिसे सोनपरी !!
नभ दाटता आकाशी,
कोसळे पाऊस सरी !
ऊन पावसाची खेळी,
रान पहा दिसे भारी !!
कावळा चिमणी पक्षी,
राना वना मुक्त फिरी !
रानमेवा पाणी पिता,
घेई आकाशी भरारी !!
गाई म्हशी शेळ्या सवे,
फिरे बारीक वासरी !
साद घालण्या गुरांना,
गुराखी वाजे बासरी !!
निष्ठुर मानव जात,
जंगलाची तोड करी !
निसर्गाच्या जीवावर,
कुऱ्हाडीचा घाव मारी !!
सिमेंट जंगल ठेवा,
संपत्ती नसती खरी !
जपू जंगल संपदा,
वृक्ष संपत्तीच खरी !!