खेड भैरव येथे बिबट्या जेरबंद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 23

शैलेश पुरोहित यांच्याकडून
इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव येथे गेल्या 15 ते 20 दिवसात बालिकेवर व तरुणावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. नागरिकांना जखमी बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने परिसरात 4 पिंजरे लावले होते. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांच्या प्रयत्नांना यश आले. खेड भैरव येथील तीन क्रमांकांच्या पिंजर्‍यात बिबट्याची मादी जेरबंद झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी, वनरक्षक, वन मजूर आदींनी ह्याकामी परिश्रम घेतले.

जेरबंद केलेला बिबट्या