इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
इगतपुरी तालुक्याचे दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला असून आज एकाच दिवशी तब्बल 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत 200 च्या आसपास कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यामुळे उद्रेक वाढत असल्याचे मानले जात आहे.
विनाकारण घराच्या बाहेर पडून मास्क न लावणे, गर्दी आणि कार्यक्रमांना हजेऱ्या लावणे, वारंवार हात न धुणे, सॅनिटायझर न वापरणे आदी कारणे उद्रेकाला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments