माणिकखांब येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सव रद्द ; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय

इगतपुरीनामा न्यूज, दि. 24
इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील जागरूक दैवत श्री भैरवनाथ महाराज देवाची मंगळवारी 26 एप्रिलला होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ह्यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याने कोणीही दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन माणिकखांब ग्रामस्थांनी केले आहे.
श्री भैरवनाथ महाराज जागृत देवस्थान हे शाश्वत देवस्थान असल्याने या पंचक्रोशीत देवास मानणारा मोठा वर्ग आहे. या देवाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. श्री भैरवनाथ महाराजाची देवाची पालखी व हनुमान जयंतीची मिरवणुक यावर्षी रद्द करण्यात आली आहे. यावर्षी यात्रेनिमित्त कोणी व्यावसायिकांनी येवू नये अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे. शासनाच्या आदेशानुसार घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी कलम 144 / 188 च्या जमावबंदीचे माणिकखांब येथे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माणिकखांब ग्रामस्थांनी घेतलेल्या यात्रा बंदच्या निर्णयाला विविध स्तरातुन प्रतिसाद मिळतो आहे.

नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे

माणिकखांब येथील जागृत दैवत भैरवनाथ महाराज यात्रोत्सव कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून ह्यावर्षी रद्द केला आहे. नागरिकांनी आपल्या घरातूनच आपल्या देवाची पूजा आणि प्रार्थना करावी. कोरोना संबंधी नियम पाळून संसर्ग रोखण्यासाठी साहाय्य करावे. अधिकाधिक लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
हरिश्चंद्र चव्हाण, माजी सरपंच माणिकखांब