आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे जातेगावकरांचे आरोग्य धोक्यात : जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात : इरफान शेख

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

ज्ञानेश्वर महाले यांच्याकडून
कोरोना काळात शासनाने आरोग्य विभागाला अतिमहत्त्व दिले असून इतरांसाठी देवदूत ठरत आहेत. मात्र त्र्यंबकेश्वर तालुका आरोग्य विभाग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत आहे. कधी महिलांची नियमबाह्य शस्त्रक्रिया तर कधी बेमुदत फेकलेल्या औषध साठ्याबाबत तालुका चर्चेत आला आहे. हरसूल जवळील जातेगाव येथे ग्रामस्थांचे हातपाय सुजणे, दुखणे या अज्ञात आजाराने २०० हुन अधिक ग्रामस्थांना अनेक दिवसापासून बाधा होत आहे. मात्र तालुका आरोग्य प्रशासनासह जिल्हा आरोग्य प्रशासन अजूनही  झोपेच्या अवस्थेत सुस्त आहे. यामुळे जातेगावकरांच्या जीवाशी आरोग्य विभागाने खेळ मांडला आहे. जिल्हा प्रशासनाने तज्ञ पथक पाठवून यासबंधी तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा दोन दिवसात कोरोना काळात त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माकपचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांनी ‘इगतपुरीनामा’ सोबत बोलतांना दिला आहे.
जातेगाव ( ता. त्र्यंबकेश्वर ) येथे गेल्या अनेक दिवसापासून ग्रामस्थांच्या हात पायाला सूज, तसेच अंगदुखीच्या व्याधी जडत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्राथमिक उपचारानंतर ही रुग्णांची अवस्था कायम आहे. त्यातच केंद्रात उपयुक्त पुरेशा उपाययोजना नसल्याने २०० अधिक ग्रामस्थ या अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावापासून बाधित झाले आहे. यामुळे एकंदरीत आरोग्य विभागानेच ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. अनेक ग्रामस्थांना या अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाचा  मनस्वी मनस्ताप सहन करावा लागला असून तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने पाठ फिरवल्याचे  चित्र दिसत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने संबंधित बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.  मात्र तालुका प्रशासन ही डोळेझाक करीत आहे. यामुळे दिवसेंदिवस येथे ग्रामस्थांच्या व्याधीत भर पडत आहे. शासनाने कोरोना काळात आरोग्याला महत्व दिले असून मात्र याउलट त्र्यंबकेश्वर तालुक्यात उलटे चित्र दिसत आहे. दुसऱ्या टप्पातील कोरोना संसर्ग ग्रामीण भागाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे. मात्र तालुका आरोग्य विभागासह जिल्हा आरोग्य विभाग मूग गिळून आहे. यामुळे जातेगावकरांच्या आरोग्याच्या हलगर्जीपणात आरोग्य प्रशासन जबाबदार आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने दोन दिवसात तज्ञ पथक पाठवून संबंधित योग्य उपाययोजना तात्काळ कराव्यात अशी मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास कोरोना काळात आंदोलन छेडण्यास भाग पाडणाऱ्या जिल्हा आरोग्य विभागाला जबाबदार धरून त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा माकपचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांनी दिला आहे.

■ त्र्यंबकेश्वर तालुक्यात आरोग्य विभागाच्या अनेक तक्रारी दिवसागणिक येत आहेत. त्यात उपकेंद्र नेहमीच बंद अवस्थेत तर कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी यामुळे येथील आदिवासी बहुल भागात आरोग्य सेवेचा पुरता फज्जा उडाला आहे. यांना अभय कुणाचे आहे ? जातेगाव येथील ग्रामस्थांना अज्ञात रोगांचा झालेला प्रादुर्भाव आरोग्य विभागाने दोन दिवसात मनावर घेतला नाही तर त्र्यंबकेश्वर किसान सभेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल.
इरफान शेख, माकप जिल्हा सेक्रेटरी

इरफान शेख, माकप जिल्हा सेक्रेटरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!