इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. काही दिवसातच इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याचे संकेत मिळत आहेत. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या वैद्यकीय अहवालानुसार १२ व्यक्ती कोरोनापासून बरे झाले. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आज फक्त अवघे ३ नवे कोरोना बाधित आढळून आले. आज दिवस अखेर इगतपुरी तालुक्यात एकंदरीत फक्त ३० कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण पाहता तीन किंवा चारच दिवसात इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडयाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत.
- बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी