इगतपुरीत दहशत माजवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात झाला कैद : इगतपुरीच्या वन विभागाला मिळाले यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

इगतपुरी शहर परिसरात नागरिकांमध्ये दहशत माजवणारा बिबट्या अखेर आज पहाटे पिंजऱ्यात अडकला. सह्याद्रीनगर भागात २ दिवसांपूर्वी एक व्यक्तीवर हल्ला करून जखमी करणारा हा बिबट्या आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ह्या परीसरात अजूनही एक बिबट्या असल्याची शक्यता गृहीत धरून वन विभागाने पिंजरा लावला आहे. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव आदींनी जेरबंद केलेल्या बिबट्याबाबत पुढील सोपस्कार केले. नागरिक भयमुक्त होण्यासाठी वन विभाग कटिबद्ध असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी सांगितले.

आज पहाटे इगतपुरी येथील शिवाजी नगर परिसरात पिंजऱ्यात हालचाल जाणवल्याने एका व्यक्तीने वन विभागाच्या कळवले. त्यानुसार ह्या पिंजऱ्यात दहशतखोर बिबट्या अडकल्याचे स्पष्ट झाले. हा बिबट्या १ वर्षाचा असून त्यासोबत अजून एक बिबट्या असू शकतो. हे गृहीत धरून अजून एक पिंजरा लावण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी नगर व परिसरात ह्या बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याने एका इसमावरही हल्ला केला होता. अखेर वनविभागाच्या प्रयत्नाला यश आले. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. वन विभागाने बिबट्याला ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी हलवले आहे.

One thought on “इगतपुरीत दहशत माजवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात झाला कैद : इगतपुरीच्या वन विभागाला मिळाले यश

Leave a Reply

error: Content is protected !!