घोटी जवळ अपघातात ३ बालिका आणि एका युवकावर काळाचा घाला : इगतपुरी तालुक्यात पसरली शोककळा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील चार जणांवर काळाने घाला घातला आहे. आज सायंकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान मुंढेगावकडे येत असताना युवकाच्या दुचाकीला ट्रकने कट मारल्याने अपघात झाला. यामध्ये 3 बालिका आणि 1 युवक ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. या अपघातामध्ये चौघे जण जागीच ठार झाले. ह्या घटनेमुळे मुंढेगाव परिसर आणि इगतपुरी तालुक्यात भयाण शोककळा पसरली आहे. याबाबत घोटी पोलिसांनी नोंद घेतली असून तपास कार्य सुरू केले आहे.

मुंढेगाव येथील तुषार हरी कडू वय 24 हा युवक मोटारसायकलीवरून घोटीला दिवाळीनिमित्त काही खरेदी करण्यासाठी पायल ज्ञानेश्वर गतीर वय 11, विशाखा ज्ञानेश्वर गतीर वय 8 रा. मुंढेगाव, ईश्वरी हिरामण डावखर वय 10 रा. गिरणारे ता. इगतपुरी यांना घेऊन घोटीला गेला होता. तिकडून गावाकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने कट मारला. यामध्ये मोटारसायकलीवरील चौघेही खाली पडले. त्यात सर्वांच्या अंगावरून ट्रक गेल्याने चौघे चिरडले गेले. यामध्ये सर्वांवर काळाचा घाला पडला. या घटनेमुळे मुंढेगाव परिसर आणि इगतपुरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. घोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. ह्या प्रकरणी घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास यांच्यासह प्रकाश कासार, मथुरे, शीतल गायकवाड यांनी तपास सुरू केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!