इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
अपत्यहीन निराधार आणि अपत्य असूनही त्यांचा सांभाळ केला जात नाही अशा वयोवृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे नेते उमेश खातळे सरसावले आहेत. अशा निराधार जेष्ठ नागरिकांसह उघडयावर संसार असणाऱ्या नागरिकांच्या घरात दिवाळीचा गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार उमेश खातळे यांनी निराधारांचा शोध घेऊन त्यांच्यात दिवाळी साजरी करून विविध उपक्रम राबवले. असे सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवले जात असतात.
यावर्षी निराधार वयोवृद्ध, महिला, बालके यांना उमेश खातळे यांनी दिवाळीनिमित्त नवीन कपडे, साड्या, मिठाई यांचे वाटप केले. नांदडगाव येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी नामदेव खातळे, दत्तू राऊत, राजाराम खातळे, विठ्ठल खातळे, अशोक सोनवणे, गणेश खातळे, प्रकाश खातळे, देविदास सोनवणे, नितीन सोनवणे, दिलीप भरीत, सुकदेव सोनवणे, काळु सोनवणे, सचिन भरीत, शरद सोनवणे आदी उपस्थित होते.
दरवर्षीचा दिवाळीचा सण गरीब, गरजवंत आणि ज्यांच्या घरात चुल कधी कधी पेटत नाही. अशा घरातील महिला, बालके यांच्यात जाऊन साजरा करतो, मिठाई, कपडे, पातळ, सोडता वाटप करुन स्वतःला वेगळाच आनंद मिळतो.
- उमेश खातळे, राष्ट्रवादी नेते