
इगतपुरीनामा न्यूज – नीलम सुरेंद्र शर्मा वय २३ रा. डहाणू मुंबई ही महिला पाटलीपुत्र एक्सप्रेसने २७ मार्चला मुंबईहुन मुगलसराय रेल्वे स्टेशन असा प्रवास करीत होती. यावेळी तिच्यासोबत आईवडिल व भाऊ बहिण, काका होते. ह्या प्रवासा दरम्यान इगतपुरी रेल्वे स्टेशन येथुन गाडी सुटल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी नातेवाईकांना झोपेतून जाग आली असता नीलम वर्मा जवळ आढळून आली नाही. म्हणून त्यांनी तिचा शोध घेतला. मात्र ती मिळुन न आल्याने नातेवाईकांनी आजुबाजुच्या प्रवासी लोकांकडे विचारपुस केली. त्यांनी सांगितल्यानुसार ही नमुद व्यक्ती इगतपुरी येथे उतरली आहे. सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याने पुढे शोध लागला नाही. आजुबाजुला व नातेवाईकांकडे विचारपुस करून शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. म्हणून फिर्यादी सुमित सुरेंद्र शर्मा वय २९ रा. डहाणू यांनी इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून पोलिसांनी नोंद घेतली आहे. अंगात पिवळा सलवार सूट, पांढऱ्या रंगाचा दुपट्टा, पायात काळ्या रंगाची चप्पल, रंग गोरा, सडपातळ, केस लांब असे नीलम वर्मा हिचे वर्णन आहे. या प्रमाणे वर्णन असलेली महिला कुठे आढळून आल्यास इगतपुरी रेल्वे पोलीस ठाणे अथवा जवळच्या कोणत्याही पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.