श्रीराम मित्रमंडळाच्या विविध स्पर्धांचे कोजागिरीला वितरण

शशिकांत तोकडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

श्रीराम मित्र मंडळ घोटी यांनी नवरात्रौत्सव निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन केले. कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत कोजागिरी पौर्णिमा मॊठ्या उत्साहात साजरी केली. नवरात्र स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. या स्पर्धेत  प्रथम क्रमांक – निकिता रोकडे ( संगीत खुर्ची ), गणेश कर्डीले ( लिंबू चमचा ), द्वितीय क्रमांक – यमुनाबाई कर्डीले ( संगीत खुर्ची ), हर्षदा भोर ( लिंबू चमचा ),  आणि तृतीय क्रमांक – रंजनाबाई तूपे ( संगीत खुर्ची ),  मोनिका तोकडे ( लिंबू चमचा ). या स्पर्धेत विशेष स्पर्धा घेण्यात आली त्यात बबलू शेख याचा बास्केटबॉल या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. मंडळाने यावर्षी महिलांना प्रोत्साहन देऊन या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतले. यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस गौरव कसाबे, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस शशिकांत तोकडे व तृतीय क्रमांकाचे बक्षीस सागर गांगुर्डे यांसकडून देण्यात आले. मंडळाने लहान मुलांच्या शिक्षणाचा विचार करत त्यांना वह्यांचे व दप्तरांचे वाटप केले. मंडळाचे अध्यक्ष तानाजी डावखर, मोहन डावखर, व इतर सर्व सदस्यांनी सांगितले की दरवर्षी मकर संक्रात गणेशोत्सव, नवरात्र व इतर सर्व सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. संक्रांतीला तिळगूळ वाटप दिवाळी फराळ वाटप असे कार्यक्रम येथे घेतले जातात. आपला सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे यासाठी मंडळ तत्परतेने काम करते. महिलांना आणि लहान मुलांना त्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी नेहमी झटत असतात. येथे अनेक जातीचे धर्माचे लोक राहतात.  पण त्यामध्ये कधीही भांडण होणार नाही याची काळजी मंडळ घेत असते। त्याचबरोबर या सर्वधर्मीय लोकांना एकत्र आणण्याचे काम मंडळाने आजवर केलेले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!